प्रभागातील मैदानांचे सुशोभीकरण करून बकालपणा घालवा
स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ येथील छत्रपती संभाजीराजे उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा. त्या उद्यानात तातडीने सुरक्षारक्षक नेमा, प्रभागातील दोन क्रिडांगणात सफाई अभियान राबवून तेथील बकालपणा घालविण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत नियत्रंणात आल्यावर पालिका प्रशासनाने शहरातील उद्याने नवी मुंबईकरांसाठी खुली केली. ज्यायोगे पावणेदोन वर्षे घरात बसलेला नवी मुंबईकर किमान उद्यानात येवून मोकळा श्वास घेवू लागला आहे. परंतु प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ येथील छत्रपती संभाजी राजे उद्यान आजही बंदच आहे. वारंवार मागणी करूनही ते अद्यापि स्थानिक रहीवाशांसाठी सुरू करण्यात आलेले नाही. इतर ठिकाणची उद्याने सुरू झालेली असल्याने स्थानिक रहीवाशी आमच्या कार्यालयात येवून आमच्यावर संताप व्यक्त करत आहेत. तुम्हाला उद्यान सुरू का करता येत नाही, इतरांनी त्यांच्या प्रभागात कशी उद्याने सुरू केशली, याचा जाब विचारत आहेत. आम्ही सातत्याने उद्यान सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. संबंधितांना हे उद्यान लवकरात लवकर स्थानिक रहीवाशांसाठी खुले करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी केली आहे.
या उद्यानात सुरक्षारक्षक पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. दररोज महिला विनयभंग, महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच लुटमार, चेनस्नॅचिंगच्या घटनाही घडत आहेत. कोरोना महामारीमुळे अर्थकारणच बिघडल्याने परिस्थिती विचित्र झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यानात येणाऱ्या महिलेचा विनयभंग होवू नये, कोणा ज्येष्ठ नागरिकांची लूटमार होवू नये, महिलांचे दागिने कोणी पळवू नये तसेच उद्यानात कोणा व्यसनी घटकांकडून पार्ट्या अथवा अमंली पदार्थाचे सेवन करण्यासाठी बसू नये यासाठी सुरक्षारक्षक उद्यानात असणे आवश्यक असल्याने उद्यानात सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी केली आहे.
प्रभाग ९६ मध्ये नेरूळ १६ मध्ये ए मध्ये स्व. मिनाताई ठाकरे मैदान आणि नेरुळ सेक्टर १६ ए मध्ये महापालिका शाळा क्रमांक ९ चे मैदान आहे. या दोन्ही मैदानात जंगली गवत वाढले असून कचराही दिसू लागल्याने मैदानांना बकालपणा आला आहे. मैदानांमध्ये दगडी पडल्या आहेत. या दोन्ही मैदानावर सफाई अभियान राबवून तेथील बकालपणा हटविण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.