स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ ( केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : योग विद्येच्या क्षेत्रात मागील ६० वर्षाहून अधिक काळ अथक कार्यरत असणारे योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे आज पहाटे वाशी येथे वयाच्या ९७ व्या वर्षी दु:खद निधन झाले. योग विद्येच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी योग्य विद्या निकेतन संस्थेची स्थापना करून असंख्य विद्यार्थी घडविले. ‘आनंददायी योग’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून आपले संपूर्ण आयुष्य योग विद्येसाठी वाहून घेतलेल्या योगगुरू सदाशिव निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्काराने सन २००४ मध्ये केला. तत्पुर्वी नवी मुंबई महानगरपालिकेनेही सन २००२ मध्ये ‘नवी मुंबई रत्न’ हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा यथोचीत गौरव केला होता.
योगगुरु स्वामी कुवलयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे धडे घेतलेल्या योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांनी योग विद्या निकेतनची स्थापना करून अनेक विद्यार्थी घडविले, जे आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग विद्येचे प्रशिक्षण देत आहेत. योगाचे महत्व जनमानसात प्रसारित व्हावे व योगविद्येविषयी रुची वाढावी याकरिता ‘आरोग्यासाठी योग’, ‘प्राणायाम’, ‘स्वास्थ्यासाठी योग’ असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.