बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे आटोक्यात येत चालली असून गुरूवारी (दि. ३० सप्टेंबर) कोरोनाचे नवे ५३ रूग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या ५९ रूग्णांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.
आज आढळून आलेल्या ५३ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १७, नेरूळ विभागात १४, वाशी विभागात ७, तुर्भे विभागात ३, कोपरखैराणे विभागात ३, घणसोली विभागात २, ऐरोली विभागात ७ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात कोरोनाचा एकही रूग्ण नव्याने आढळला नाही. ४ हजार ९०२ जणांनी आज नवी मुंबईत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधधील कोव्हिड रूग्णालयात १३९ जण तर अन्य ठिकाणी ३९ जण कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. ३२१ जण होम आयसोलेशन होवून कोरोनावर उपचार घेत आहेत.