स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोकणात झालेल्या अतिवृष्टीने बाधित लोकांना मिळालेली मदत व करण्यात आलेले पंचनामे जाहिर करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी एका लेखी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मराठवाडा विभागात होत असलेल्या अतिवृष्टीने त्या भागाची खूपच हानी झाली असून बळीराजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मागील महिन्यात कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीने कोकणवासियांचीही खूप हानी झाली होती. चिपळूण भागात तर घराघरात चिखल पसरला होता. तेथील लोकांचे संसार व गृहोपयोगी सर्व वस्तूंची हानी झाली होती. या घटनेला महिन्याचा कालावधी लोटला असून कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या लोकांना आपण आजवर काय मदत केली आहे. कोणकोणत्या भागात किती जणांना सरकारी पातळीवर मदत करण्यात आली आहे याची माहिती मिळावी अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.