स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. १३ मधील ऐरोली गाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता बांधण्यात आलेल्या नवीन विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी सोहळ्यास जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, माजी विरोधी पक्षनेता विजय चौगुले, माजी नगरसेवक मनोज हळदणकर, माजी आकाश मढवी, करण मढवी, नवीन गवते, चेतन नाईक, संजू वाडे माजी नगरसेविका नंदा काटे व समस्त शिवसैनिक, पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार नगरसेवक मनोज हळदणकर आणि नगरसेविका नंदा काटे यांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याकरिता खासदार निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती. खासदार राजन विचारे यांनी विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हाव्ही यासाठी आपल्या खासदार निधीतून २० लाख खर्च करून हा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारला. माझ्या खासदार निधीचा अशा सुंदर वास्तूसाठी उपयोग झाला याचा मला आनंद आहे. तसेच या विरंगुळा केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच फायदा होईल असे खासदार राजन विचारे यांनी म्हंटले.