स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने अरबी समुद्रात ३ दीपस्तंभास मंजुरी
नवी मुंबई : नुकताच खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या विषयाबाबत आयोजित केलेल्या बैठकीत उत्तन येथील मच्छिमारांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग मार्फत मार्केट साठी जागा उपलब्ध करण्यासाठी तसेच जिल्हा नियोजन फंडातून कामांच्या निधी बाबत विचारणा केली असता मिरा भाईंदर महानगरपालिकेने मार्केटच्या जागे बाबत जागा निश्चित केलेली आहे. या जागे संदर्भात स्थानिकांशी चर्चा करून जागा निश्चित करावी अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना दिल्या.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे उत्तन येथील मच्छीमारांच्या खडकावर बोटी आढळून होणारे नुकसान टाळण्यासाठी वाशी खडक, कातल्याची वाट खडक, सऱ्याची वाट खडक या तीन ठिकाणी दीपस्तंभ उभारण्याच्या कामाला केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा नियोजन मधून सदर कामासाठी ३ कोटी ५८ लाख ८० हजार ३८२ रकमेची प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नगर भवनाची इमारत आरक्षण क्रमांक ५६ मैदानाची जागा तसेच सार्वजनिक सुविधांमध्ये असलेल्या आरक्षणाच्या जागा या सर्व शासनाच्या जागे संदर्भात मीरा भाईंदर महापालिकेस कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याबाबत विचारणा केली असता सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवून शासनाची मंजुरी घेतली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच उत्तन पाली येथील दवाखाना व निवास स्थानाची जागा हस्तांतरण करण्यासाठी भुमी अभिलेख यांच्यामार्फत मोजणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मीरा-भाईंदर महापालिकेस हटकेश उद्योग नगर येथे ३० मीटर रुंद रस्ता करण्यासाठी जागा भूसंपादन करणेबाबत प्रांत ऑफिस यांची नेमणूक करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.