स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी तसेच डासांच्या उपद्रवातून स्थानिक रहीवाशांची मुक्तता करण्यासाठी सानपाडा प्रभाग ७६ मध्ये गृहनिर्माण सोसायटींच्या आवारात धुरीकरण करण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये प्रभाग ७६चा समावेश होत असून प्रभागात सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणावर असून काही प्रमाणात खासगी गृहनिर्माण सोसायट्यांही आहेत. सध्या पावसाळी हंगाम संपत आलेला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. डासांमुळे स्थानिक भागातील रहीवाशांना साथीच्या आजारांचाही सामना करावा लागलेला आहे. सांयकाळनंतर घराची दारे-खिडक्याही उघड्या ठेवता येत नाही. सोसायटी आवारात फिरताही येत नाही. आपण पालिकेच्या डास निर्मूलन विभागाला प्रभाग ७६ मधील सानपाडा परिसरातील सर्वच गृहनिर्माण सोसायटीच्या आतील भागात, उद्यानात तसेच क्रिडांगणात फवारणी सातत्याने करण्याचे निर्देश देवून प्रभाग डासमुक्त करण्यासाठी स्थानिक रहीवाशांना सहकार्य करण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
चौकट
महापालिका प्रशासनाला धुरीकरण करणे व ब्लिचिंग पावडर टाकणे याबाबत सातत्याने लेखी पाठपुरावा करूनही प्रशासन उदासिनता दाखवित आहे. पालिका प्रशासनाने प्रभागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले तरी माझ्यासारख्या समाजसेवकाला हे पाहवले नाही व गेल्या महिन्याभरापासून मी स्वखर्चातून प्रभागात सातत्याने धुरीकरण मोहीम व ब्लिचिंग पावडर फवारणी करत आहे. सानपाडावासिय करदाते आहे. पालिकेकडे ते कराचा भरणा करत आहेत. त्यांना नागरी सुविधा देणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मी पुन्हा एकवार धुरीकरणासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
:- पांडूरंग आमले, समाजसेवक, प्रभाग ७६