निलेश मोरे : ९७५७३८११००
Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : खो खो हा खेळ महाराष्ट्राच्या मातीत पुण्यात उगम पावलेला खेळ आहे. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा ( पुरुष ) १९६० मध्ये आयोजित करण्यात आली होती. १९६१ मध्ये खो खो चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली. १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये खो खो चा प्रात्यक्षिक सामना खेळला गेला. खो खो हा नुसता खेळ नसून निरोगी आरोग्यासाठी खेळला जाणारा मातीतला अस्सल खेळ आहे . या खेळाचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे मुंबई उपनगर खो खो संघटनेचे अध्यक्ष राजेश सुभेदार यांनी रविवार, दि. २१ रोजी समता विद्या मंदिर साकिनाका येथे आयोजित द्वेवार्षिक सभेत मत व्यक्त करताना केले. मुंबई उपनगर खो खो संघाची द्वेवार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे निरीक्षक माधुरी कोळी हे हजर होते. या सभेत कमलाकर कोळी, मुंबई उपनगर संघटनेचे प्रभारी सचिव डॉ नरेंद्र कुंदर, उपाध्यक्ष प्रशांत पाटणकर, उमेश भायदे, सूचित येद्रे तसेच पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.