संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२०’ पांडुरंग आमले यांना गौरविण्यात आले आहे.
सानपाडा येथील सौराष्ट्र हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पांडुरंग आमले यांना ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२०’ने सन्मानित करण्यात आले., याच कार्यक्रमात साईभक्त महिला फाऊंडेशन सानपाडा परिसरात महिला वर्गासाठी करत असलेल्या उल्लेखनीय जनताहितैषी कार्याचीही दखल यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनकडून घेण्यात आली. साईभक्त महिला फाऊंडेशन या सामाजिक संघटनेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. साईभक्त महिला फाऊंडेशनच्या सौ. शारदाताई पांडुरंग आमले व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणातून पांडुरंग आमले करत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रम संपल्यावर लोकनेते गणेश नाईक यांनीही पांडुरंग आमले यांच्या कार्याची दखल घेत पांडुरंग व सानपाड्यातील इतरही भाजपचे घटक जनसेवेत वाघ असल्याचे सांगत त्यांनी आमले यांच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, नवी मुंबई शिवसेना महिला आघाडी संघठक सौ. रंजना शिंत्रे, मुंबै बँकेचे संचालक अनिल गजरे, जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका दमयंती आचरे व यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.