संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये ‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत घरोघरी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्याची लेखी मागणी भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटातून आपण अजून सावरलो नाही तोच ओमिक्रॉन आपल्या शहराच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. प्रभाग ७६ मधील रहीवाशी अजूनही कोविड डोस पहिला व दुसऱ्यापासून वंचित आहे. महापालका प्रशासन ‘हर घर दस्तक’ या अभियानाच्या माध्यमातून सोसायटी आवारात जावून रहीवाशांना लसीकरण (डोस) उपलब्ध करून दिले जात आहे. प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबवून हा प्रभाग १०० टक्के लसीकरण करण्यात यावा. यासाठी आपणास जे जे सहकार्य लागेल, ते सर्व सहकार्य आपणास उपलब्ध करून दिले जाईल. ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरण (डोस) आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे अभियान प्रभागात राबवून रहीवाशांना लसीकरण करण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.