संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिवसातून तीन ते चार वेळा नवी मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे नवी मुंबई शहरात कोरोना महामारीवर नियत्रंण मिळविणे शक्य झालेले आहे. आता नव्याने ओमायक्रॉन संकट निर्माण झालेले आहे. ओमायक्रॉनचा रूग्ण आढळला नसला तरी पालिका प्रशासनाने त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील गावांमध्ये, कॉलनी परिसरात, झोपडपट्टी परिसर, चाळी, खाण परिसर, एमआयडीसीमध्ये, महापालिका उद्यान व क्रिडांगणाच्या सभोवताली मोठ्या संख्येने सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. गावातील चाळीतील भाडेकरू अथवा सभोवतालचे रहीवाशी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा स्नानासाठी व शौचासाठी वापर करत असतात. उद्यानात व क्रिडांगणात सकाळी फिरावयास येणारे नागरिकही सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करतात. रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारीही स्वच्छतागृहांचा वापर करत असतात. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तेथील अस्वच्छता, दुर्गंधी तसेच रहीवाशांचा वावर पाहता या स्वच्छतागृहांचे दिवसातून तीन ते चार वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिका प्रशासन गेल्या काही महिन्यापासून सातत्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) दिवसातून पाच वेळा करत आहे. त्यामुळे धारावीसारख्या महाकाय, अक्राळविक्राळ स्वरूपात पसरलेल्या झोपडपट्टी परिसरात कोरोना महामारी आटोक्यात आलेली आहे. ओमायक्रॉनचे सावट पाहता त्या ठिकाणी आजही सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून पाच वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केले जात आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील गावांमध्ये, कॉलनी परिसरात, झोपडपट्टी परिसर, चाळी, खाण परिसर, एमआयडीसीमध्ये, महापालिका उद्यान व क्रिडांगणाच्या सभोवताली मोठ्या संख्येने सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा निर्जंतुकीरण करण्याची विशेष मोहिम राबविण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
00000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई