संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : १६ डिसेंबर २०२१, बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी ऐतिहासिक दिवस मानला जाईल. गेली काही वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली गेली होती. ती बंदी उठविण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापासून अनेक भागातील विविध राजकीय घटकांनी, सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने काही सशर्त अटींवर ही बंदी उठविल्याने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात विखुरलेल्या बैलगाडा शर्यत प्रेमींकडून जल्लोष साजरा करण्यात आला. कामोठेतील बैलगाडा प्रेमींकडूनही खंडेरायाची तळी भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जुन्नर आंबेगाव रहिवासी संघ कामोठे नवी मुंबई येथे शिव शंकर मंदिर येथे खंडेरायाची तळी भंडार करून फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले. भंडार उधळून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सचिन गुळवे, गणेश अभंग, राजू गुंजाळ, धनंजय येवले, राजेश काचळे, निलेश शेळके, ज्ञानेश्वर सरवदे, आवारी मामा, गणेश नवले, मंगेश खांडगेपाटील ,गणेश खांडगेपाटील ,स्वयंम खांडगेपाटील, मल्हार खांडगेपाटील, निलेश शिंदे, निखिल जाधव, भूषण गुंजाळ, अजित पावडे, शैलेश ठुबे यांच्यासह जुन्नर आंबेगाव रहिवासी संघ कामोठे नवी मुंबईचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्नर व आंबेगाव संघ कामोठे, नवी मुंबईचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी गणेश खांडगेपाटील यांनी या निर्णयामुळे महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. गावागावात पुन्हा बैलगाडा शर्यत पहावयास मिळतील. पुन्हा तोच उत्साह, जल्लोष, आरोळ्या ऐकण्यासाठी व नंबरी फळी फोड गाडा पाहण्यासाठी सर्व आतुर झाले असल्याचे सांगितले.