संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील कियॉस्कमधील गटारे बंदीस्त करण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते, समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ३ परिसरात सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरच छोट्या व्यावसायिकांसाठी कियॉस्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कियॉस्कमधील छोट्या दुकानांसमोर पाणी वाहून जाण्यासाठी लहान लहान गटारांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या गटारांवर जाळ्या सुरूवातीला बसविण्यात आल्या होत्या. तथापि अनेक लहान गटारांवरील जाळ्या तुटल्या आहेत. काही जाळ्या चोरीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी व्यावसायिकांना लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. या फळ्याही तुटल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करणारे गटारात पाय अडकून पडण्याच्या घटना दररोज घडत आहेत. संबंधितांना दुखापतीही होत आहेत. स्वत: आल्यास अथवा संबंधित माणूस पाठवून या समस्येची छायाचित्रे मागवून घेतल्यास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. लवकरात लवकर या गटारांवर लोखंडी जाळ्या बसविण्याचे निर्देश देवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
०००००००००००००००००००० ०००००००००००००
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७, ३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई