संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांची नवीन वर्षाचे आनंददायी स्वागत आगरी कोळी महोत्सवाच्या माध्यमातून करण्याची परंपरा आहे. करोना मुळे दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर नेरुळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर ५ जानेवारी २०२१ रोजी आगरी-कोळी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून होत असते.
खवय्यांसाठी अस्सल आगरी कोळी पद्धतीचे खाद्यपदार्थांची मेजवानी,कला रसिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम, लहानग्यांसाठी खेळणी आणि पाळणे, महिलावर्गासाठी खरेदीचे अनेक स्टॉल उपलब्ध असतात. त्याच बरोबर कुठल्याही प्रवेश फी शिवाय नवी मुंबई आयडल, लावणीसम्राज्ञी, बेस्ट ग्रुप डान्सर, स्टॅन्ड अप कॉमेडियन या स्पर्धा असतात.
यंदाच्या आगरी कोळी महोत्सव २०२२ मधील नवी मुंबई आयडल, लावणीसम्राज्ञी, द बेस्ट ग्रुप डान्सर आणि द बेस्ट स्टॅंड अप कॉमेडियन साठी ऑडिशन २६ व २७ डिसेंबर २०२२ रोजी एन आर बी सोशल ट्रस्ट शिक्षण संकुल, एन आर भगत कॉलेज, सेक्टर २०, नेरूळ, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहेत.
00000000000000000000000000 00000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई