संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोकणवासियांसाठी ‘स्वतंत्र कोकण विद्यापिठ’ निर्माण करण्याची लेखी मागणी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कोकण भागातल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सुटाव्यात, त्यांच्या अडचणींचे निवारण व्हावे, त्यांच्या असुविधा संपुष्ठात येवून त्यांना सुविधा प्राप्त व्हाव्यात. त्यांना शिक्षण घेताना कोणतेही अडथळे निर्माण होवू नये यासाठी आजतागायत कोणत्याही राज्य सरकारने आस्था दाखविलेली नाही. गांभीर्याने प्रयत्नही केले नाहीत. कोकण भागामध्ये आज वेगाने नागरीकरण पर्यायाने शहरीकरण वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे विद्यार्थी संख्याही वाढत आहे. शिक्षण दर्जेदार मिळावे व शिक्षण घेताना अडचणी कमी झाल्या तर मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोकणात उच्चशिक्षितांची फळी मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. कोकणात आाज जागा मुबलक प्रमाणावर आहे. कोकणातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी आज कोकणवासियांना खऱ्या अर्थांने स्वतंत्र कोकण विद्यापिठाची गरज आहे. या विद्यापिठाच्या माध्यमातून अधिकाधिक शैक्षणिक संधी स्थानिक भागात उपलब्ध झाल्या पाहिजे. कोकणातील विद्यार्थ्याला शिक्षणासाठी बाहेर कोठेही जाण्याची वेळ येवू नये. कोकण कॅलिफोर्निया करण्याची घोषणा अनेक दशकापासून कोकणचा माणूस ऐकत आला आहे. कोकणला आज कॅलिफोर्नियाची नाही तर शैक्षणिक सुविधांची पर्यायाने स्वतंत्र विद्यापिठाची स्थानिक भागात गरज आहे. कोकणची मुले शिक्षणाद्वारे स्वत:ची प्रगती करतील व आपल्या ताकदीवर कोकणचा कॅलिफोर्निया करतील. कोकणचा शैक्षणिक विकास करण्यासाठी, खऱ्या अर्थाने कोकणात शैक्षणिक गंगा वाहून येथे शैक्षणिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कोकणसाठी स्वतंत्ररित्या ‘कोकण विद्यापिठा’ची स्थापना करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
00000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई