संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था दूर करण्याची लेखी मागणी पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महानगरपालिकेने एकेकाळी शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केलेली आहे. या तानाजी मालुसरे क्रिडांगणाला व जिजामाता उद्यानाला गेल्या काही महिन्यापासून बकालपणा येवून एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या उद्यानाच्या वरूणा व एव्हरग्रीन सोसायटीच्या बाजूने असलेले उद्यानाचे व क्रिडांगणाचे दरवाजे तुटून गळून पडलेले आहेत. येथील लहान मुलांची खेळणी नावाला असून या खेळण्यांची थडगी झाली आहेत. लहान मुलांचे झोपाळे पूर्णपणे तुटलेले आहेत. त्याचा खेळण्यासाठी काहीही वापर होत नाही , तर तो सांगाडा काय स्वच्छ भारत अभियानात दाखविण्यासाठी पालिका प्रशासनाने ठेवला आहे काय? तीच अवस्था लहान मुलांच्या खेळण्यातील बदकाची आहे. त्यातील एक बदक नाहीसा झालेला असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
उद्यानात उंदरांनी ठिकठिकाणी खड्डे घेतले असून क्रिडांगणात आजही जंगली गवत, दगडी पडलेली आहे. उद्यान व क्रिडांगणाला सुरक्षा रक्षक देण्यात आलेला नाही. उद्यान व क्रिडांगणात मोकाट व भटकी कुत्री वावरत असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे असे प्रकार दररोज घडत आहेत. तसेच उद्यान व क्रिडांगणात परिसरातील रहीवाशी त्यांची पाळीव कुत्री फिरावयास आणत असून ज्या ठिकाणी मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, त्याच मार्गावर कुत्र्यांचे शौच पहावयास मिळते. सुरक्षा रक्षक ठेवल्यास उद्यानात फिरणाऱ्या महिला व मुलींना सुरक्षिततताही प्राप्त होईल. मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, तेथील लाद्याही उखडल्या गेल्या आहे. या मॉर्निग वॉकच्या लाद्याही तुटलेल्या असतील तेथे नव्याने बसविण्यात याव्यात. उद्यान व क्रिडांगणाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करून तेथील बकालपणा हटवावा. झोपाळा व बदकाची दुरूस्ती, तुटलेल्या दोन्ही प्रवेशद्वाराची दुरूस्ती करण्यात यावी, उद्यानात सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्यावा. भविष्यात महिलांची छेडछाड, विनयभंग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. आपल्या माहितीस्तव समस्येची छायाचित्रे सादर करत आहोत. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटवून बकालपणा घालविण्यासाठी व सुविधा तातडीने पुरविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत संदीप खांडगेपाटील यांनी ११ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारपत्र सादर केले होते. आयुक्त कार्यालयाकडून “Executive Engineer (Nerul)” <ee_nerul@nmmconline.com>,
Sanjay Desai cityengineer@nmmconline.com यांना ते तक्रारपत्र फॉरवर्डही करण्यात आले. पण या १३ दिवसात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जंगली गवत, तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार, बकालपणा आजही कायम आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी निवेदन फॉरवर्ड न करता उद्यान व क्रिडांगणाला भेट दिल्यास खरी परिस्थिती समजण्यास मदत होईल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
00000000000000000000000000 00000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई