श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्ठात आणावी अशी लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांना तसेच सारसोळे गावच्या ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. रहीवाशांनी, ग्रामस्थांनी विविध राजकीय घटकांकडे तक्रारी केल्यावर अथवा पाणीपुरवठ्याशी संबंधित नायडू यांच्याकडे तक्रार केल्यावर तसेच पालिका अधिकाऱ्यांचे अभियान झाल्यावर दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. पहाटे ४ ते ४.१५ वाजता पाणी येते व सकाळी ८ वाजेपर्यत पाणी असायचे, पण गेल्या काही दिवसांपासून सकाळी ९ वाजेपर्यत पाणी असते. सांयकाळी ८ ते ९ या वेळेत पाणी येते. पाणी कमी दाबाने असल्याने रहीवाशांना पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. आठ-दहा सदनिका असलेल्या छोट्या इमारतींना पाण्याचा त्रास होत नाही, पण २० ते ४० अथवा त्याहून जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना कमी दाबाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी तसेच सारसोळे गावचे ग्रामस्थ हे करदाते असून पाण्याचे देयकही वेळेवर भरतात. मग त्यांनी कमी दाबाच्या पाण्याविोषयी अजून किती काळ विविध राजकारण्यांकडे तक्रारी करायच्या. सारसोळे गावच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना माफक पाणी मिळण्याचा अधिकार नाही का? सांयकाळी केवळ एक तास पाणी असल्याने पाणी पूर्ण भरताही येत नाही. त्यामुळे सांयकाळी किमान एक तास पाणी वाढवून मिळण्याची मागणी नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकडून तसेच सारसोळे गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने कमी दाबाच्या पाण्याची समस्या संपुष्ठात आणून माफक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे व सांयकाळी पाण्याच्या वेळेत एक तासाने वाढ करावी याविषयी संबंधितांना निर्देश देवून नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.