श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमधील तसेच सभोवतालच्या रहीवाशांसाठी महापालिका प्रशासनाने सीव्ह्यू हे छोटेखानी उद्यान विकसित केलेले आहे. या उद्यानाचे सुशोभीकरणही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. कोरोना महामारी नियत्रंणात आल्यावर महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील सर्व उद्याने व क्रिडांगणे खुली केली. तथापि सेक्टर सहामधील सुश्रुषा हॉस्पिटलसमोरील तसेच सीव्ह्यू सोसायटीच्या लगत असलेले सीव्ह्यू उद्यान अद्यापि महापालिका प्रशासनाने अद्यापि लोकांसाठी खुले केलेले नाही. या विभागात असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजामाता भोसले उद्यानाला बकालपणा आलेला आहे. खेळणी तुटलेली आहेत. प्रवेशद्वार दोन्ही तुटले आहेत. जंगली गवत आजही वाढलेले आहे. आपणाकडे याबाबत पाठपुरावा करून व आपण तात्काळ दखल घेत संबंधितांना निर्देश देवूनही या उद्यानात व क्रिडांगणाकडे कानाडोळाच आजवर झालेला आहे. महापालिका प्रशासनाने किमान सुस्थितीत व सुशोभीत असलेल्या सीव्ह्यू उद्यान स्थानिक जनतेसाठी खुले करावे. सभोवतालच्या रहीवाशांना सकाळ व संध्याकाळ या उद्यानाचा वापर करता येईल. पालिका प्रशासनातील संबंधितांना उद्यान सकाळ व संध्याकाळी खुले करण्याचे निर्देश देण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
00000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई