संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेतील वाहन चालकांना बायोमेट्रीक पध्दत लागू करू नये अशी लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात तसेच इतर विभागात कार्यरत असलेल्या वाहन चालकांसाठी बायोमेट्रीक पध्दत बसविण्याचे नियोजित आहे. तथापि हजेरी वेळेसाठी उपयुक्त असलेली बायोमेट्रीक कार्यप्रणाली वाहनचालक व महापालिका प्रशासनासाठी उपयुक्त नसून संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. अनेकदा वाहन चालकांना अधिकारी सकाळी लवकर बोलावितात. सायंकाळी कुठे साईटवर गेल्यास रात्री उशिरापर्यंतही वाहनचालकांना अधिकारी वर्गासोबत राहावे लागते. त्यामुळे सकाळी लवकर बोलाविल्यावर अथवा रात्री उशिरापर्यंत थांबल्यावर वाहनचालकांनी बायोमॅट्रीक कुठे व कसे करायचे? हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या कामाच्या वेळा स्पष्ट करणारे व वेळेसह हजेरी दर्शविणारे बायोमेट्रीक ना वाहनचालकांसाठी उपयुक्त आहे ना प्रशासनासाठी. उलट त्या बायोमेट्रीक वाहनचालक व प्रशासनात संभ्र्रमावस्था निर्माण करणारी आहे. चालकांनी सकाळी वेळेअगोदर व रात्री उशिरा थांबल्यास बायोमेट्रीक कसे करायचे? त्यामुळे ज्या कार्यप्रणाली सुसूत्रतेऐवजी गोंधळ होणार असेल तर ती कार्यप्रणाली प्रशासनाने न राबविणेच उपयुक्त ठरेल. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने वाहन चालकांसाठी बायोमेट्रीक कार्यप्रणाली न राबविण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.