नवी मुंबई : निरगुडसरच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील दहावीच्या १९८३च्या बॅचचा गेटटुगेदर नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी काढण्यात आलेल्या छोटेखानी सहलीमध्ये अप्रतिम निसर्ग सहवास लाभल्याची माहिती तुकाराम टाव्हरे यांनी दिली.
यावेळी या बॅचचे सदस्य व त्यांचे कौंटूबिक सदस्य यांनी अनुभवला. निसर्गाचा अव्वल नमुना तिन्ही बाजुंना आकाशाला भिडलेले डोंगर व उत्तरेला विस्तीर्ण डिंभे जलाशय पाहण्यास मिळाले. प्रथम श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पवित्र मंदीरात जाऊन श्री भगवान शंकराचे दर्शन सर्वांनी घेतले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने सुरवात झाली. आणि आठवणील रम्य क्षण प्रत्येकाने अनुभवले.त्यात भर पडली ती या सर्वांना एकत्र आणण्याच्या कामात अग्रेसर राहून विनोद सम्राट व सतत हसवत ठेवणाऱ्या अष्टविनायक प्रॉपर्टी डीलर्सचे सर्वेसर्वा उद्योजक तुकाराम टाव्हरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेट टूगेदर बेंढारवाडी मुक्काम व निसर्ग निवास छान झाला. यावेळीं रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव व प्राचार्य उत्तमराव आवारी सर, प्राचार्य अशोक वळसे सर, उद्योजक सुरेश शिंदे, उद्योजक व बॅचचे संघटक , समन्वय दिलीपराव टाव्हरे, ह.भ. प व पुणे बी.एस.टी अधिकारी दत्तात्रय टाव्हरे या बॅचच्या सर्व सदस्याबरोबर सर्वांच्या अर्धागिनी उपस्थित होत्या. व तुकाराम टाव्हरे यांचे साडु व मेव्हणी हे पाहुणे सुद्धा आनंदाने सहभागी झाले .
उद्योजक सुरेशराव शिंदे यांची संपूर्ण आदर्श फॅमिली मुलगा व २ मुलींनी उपस्थित राहून त्यांनी बॅचच्या सदस्या प्रमाणे उस्फुर्त सहभाग घेऊन सर्वांच्या आनंदात भर घातली. संतोष हांडे, सौ. सविता हांडे या पाहुण्या असलेल्या जोडीने सुंदर सहभाग घेऊन विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रुपाली गुंजाळ हिने उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्य सादर करून बॅच सदस्य कुटुंब यांच्याबरोबर इतर आलेले पर्यटक यांची वाहवा मिळविली. भरपूर मासे, चिकन, चुलीवर भाजलेल्या भाकरी, चहा, भजी, पोहे आदींची प्रचंड रेलचेल झाली. संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या, १९८३ च्या दहावी बॅचच्या करामती, किस्से, गुरुजन यांचे अनुभव, शेकोटी आस्वाद घेत रात्रीचे १२ कधी वाजले हे समजले सुध्दा नाही. विविध कार्यक्रम घेतले. स्विमिंग व बोटींगचा थरारक अनुभव घेतला. तुकाराम टाव्हरे यांनी सर्वांना हसवून प्रत्येकाची विनोदाने विकेट घेतली.
खरोखर निसर्ग रम्य परिसरात हे मार्च १९८३ च्या बॅचचे २५ डिसेंबर २०२१ चे स्नेहसंमेलन अविस्मरणीय पध्दतीने उत्साहात संपन्न झाले.