श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ९६ च्या नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांचा सर्वसमावेशक आढावा घेणाऱ्या सन २०२२च्या दिनदर्शिकेचे वितरण घरोघरी जावून करण्याचा शुभारंभ झाला असून प्रभाग ९६ व ९७ मध्ये घरोघरी जावून ५००० हून अधिक दिनदर्शिकेचे वितरण करणार असल्याची माहिती जनसेवक गणेश भगत यांनी दिली.
प्रभागातील जनतेला विकासकामांची माहिती व्हावी या संकल्पनेतून नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी बनविलेल्या दिनदर्शिकेचे प्रभागातील महिलांच्या हस्ते लोर्कापण करण्यात आले. लोर्कापण झाल्यावर प्रभाग क्रमांक -९६/९७ मध्ये घरोघरी दिनदर्शिकेचे वाटप सुरु करण्यात आले. वर्षभरात केलेल्या विकास कामांची माहिती या श्री गणेश दिनदर्शिका-२०२२ मध्ये उपलब्ध असते. दिनदर्शिकेचे लोर्कापण करताना नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्यासमवेत सौ. प्राजक्ता प्रभु, सौ.सुनीता कारंडे, सौ. राजश्री नार्वेकर, सौ. प्रेमा यादव, सौ. छाया वोवाले, सौ. स्वाती परब, सौ. सुनिता निमसे, सौ. रेखा कांबळे, सौ. सीमन गुप्ता, सौ. सुनीता पवार, सौ. सुनीता मस्कर, सौ. सुनीता परबलकर, सौ. वर्षा चव्हाण, सौ. नम्रता राऊत, सौ. वासंती पातेरे या महिला उपस्थित होत्या.
सौ. रूपाली किस्मत भगत यांनी पाच वर्षाच्या व त्यानंतर प्रशासकीय राजवट असलेल्या दीड वर्षाच्या कालावधीत प्रशासन दरबारी पाठपुरावा करून प्रभागातील नागरी समस्यांचे निवारण केलेले आहे. जनसेवक गणेश भगत, स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या परिश्रमामुळे प्रभागाला शहरी भागात नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छतेत प्रथम क्रमाकांचा पुरस्कारही मिळालेला होता. आपण प्रभागासाठी केलेल्या महत्वपूर्ण कामाची तसेच राबविलेल्या उपक्रमाची स्थानिक जनतेला दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरटी माहिती उपलब्ध करून देण्यात येत असल्याची व गेली काही वर्षे दिनदर्शिका अभियान तसेच घरटी वितरण होत असल्याची माहिती नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी दिली.