संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबविण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीपाठोपाठ आपल्या देशात ओमिक्रॉन या नवीन संसर्गजन्य आजाराचे आगमन झाले आहे. या आजाराचा नवी मुंबई शिरकाव झालेला आहे. कोरोना महामारीने नवी मुंबईची खुप हानी झाली असून अनेक कुटूंबांना कोरोनामुळे कर्त्या माणसाचे निधन झाल्याने कायमचेच आर्थिक अपंगत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने शिरकाव झालेल्या ओमिक्रॉन आजाराबाबत जनसामान्यांमध्ये अफवा पसरण्यापूर्वी तसेच नवी मुंबईकर अफवांच्या आहारी जाण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने या आजाराबाबत नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती अभियान राबविणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
ओमिक्रॉन आजार काय आहे, तो कशामुळे निर्माण होतो व पसरतो, हा आजार होवू नये म्हणून काय उपाययोजना करावी आणि आजार झाल्यावर काय करावे, या आजाराच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण सोसायट्यांनी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी याविषयी महापालिका प्रशासनाकडून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून इंत्यभूत माहिती मिळावी. महापालिका प्रशासनाने समाजमंदिर, पालिका शाळा, उद्यान, क्रिडांगणे, घरटी आजारविषयक प्रचार साहित्य, पथनाट्य या माध्यमातून लवकरात लवकर जनजागृती अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.