नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रविवार, दि. २ जानेवारी २०२२ रोजी स्थानिक रहीवाशी व सामाजिक संस्थांच्यामदतीने स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गेल्या वर्षीही या उद्यानात व क्रिडांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. सध्या तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार, क्रिडांगणात वाढलेले जंगली गवत, विखुरलेल्या प्लास्टिक पिशव्या, दगड, माती यामुळे या उद्यान व क्रिडांगणास बकालपणा आलेला आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबवून मै दानातील जंगली गवत, दगड, माती हटवून व विखुरलेल्या पिशव्याचे संकलन करून एका कोपऱ्यात त्याचा ढिगारा बनवून पालिका प्रशासनाकडून ते उचलण्यात येणार असल्याची महादेव पवार यांनी दिली.
मैदानात मॉर्निग वाकसाठी अनेक रहीवाशी येतात. वाढलेले जंगली गवत व अन्य कारणास्तव आलेला बकालपणा यामुळे हे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून स्थानिक रहीवाशांनी, सामाजिक संस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महादेव पवार यांनी केले आहे.