शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांची कृषीमंत्री दादाजी भुसेंकडे मागणी
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
बीड : महाराष्ट्रात सध्या रब्बी उन्हाळी हंगामात पेरणी सुरु आहेत .ऊस. फळबाग. भाजीपाला. गहु या पिकासाठी शेतकऱ्यांकडुन खताची मागणी वाढत आहे . त्याचवेळी खतांच्या किंमतीत ५० किलोच्या गोणीमागे जवळपास २०० रूपयांची अचानक दरवाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खतांची दरवाढ रद्द करून जुन्याच दराने खतांची पुन्हा विक्री करण्याची बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा गावातील शेतकरीपुत्र राजेंद्र नवले यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका लेखी निवेदनातीन केली आहे.
रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा व याबाबत कृषी विभागाने ही लक्ष ठेवावे. रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे खते बी बियाणे रासायनिक खते यांच्या किंमती वाढत आहेत. केंद्र सरकारने व राज्य सरकारने खत विक्री दर नियंत्रित करावे. महागडे खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. ६ डिंसेबर २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रति ५० किलो बँगचा खतनिहाय दर
१०.२६.२६. १४४० (१६४०) १७० रुपये वाढ
१६.२०.१३. १०७५ ( १२५०) १७५ रुपये वाढ
१५.१५.१५.०९. ११८० (१३७५) १९५ रुपये वाढ
खताचे भाव कमी करण्याची मागणी शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी केले आहे