संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये डासांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर धुरीकरण तसेच गटारांची तळापासून सफाई करण्याची लेखी मागणी भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये डासांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी अनेक गृहनिर्माणस सोसायटीतील रहीवाशांकडून आमच्या कार्यालयात करण्यात येत आहेत. सांयकाळी ६ नंतर दारे-खिडक्या डासांच्या भीतीने बंद करून घ्याव्या लागत आहेत. सोसायटीच्या आवारातही डासांमुळे थांबणे शक्य होत नाही. आपण प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धुरीकरण मोहीम राबविण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी निवेदनातून केली आहे.
प्रभागातील गटारांची तळापासून सफाई करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. गटारांतील कचरा काढल्यास दुर्गंधीही येणार नाही. तसेच डासांचा उद्रेकही वाढीस लागणार नाही. डासांचा उद्रेक कायम राहील्यास प्रभाग ७६ मध्ये मलेरिया व अन्य साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रभाग ७६ मधील डासांची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.