स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ३६ मध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयात जनसेवक गणेशदादा भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या माध्यमातून ई श्रम कार्ड वितरणास सुरुवात झाली आहे.
गणेशदादा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ३६ मधील भाजपच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिष्ठचिंतनानिमित्त सत्यनारायणाच्या पुजेचे व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या अभिष्ठचिंतन सोहळ्यास ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार लोकनेते गणेश नाईक, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, माजी नगरसेवक सुरज पाटील, गिरीश म्हात्रे, नेरूळ भाजपचे अध्यक्ष राजू तिकोणे यांच्यासह नवी मुंबई महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी , कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणेशदादा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी ई श्रम कार्ड नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानात स्थानिक भागातील दोनशेहून अधिक रहीवाशांनी आपली नोंदणी केली. रविवारी, १३ फेब्रुवारीपासून नेरूळ सेक्टर १६ मधील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयातून या कार्डच्या वितरणास सुरूवात झाली आहे.