स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यातील अंधुक प्रकाशाची समस्या दूर करून त्याजागी रस्त्यावर माफक उजेड पडेल असे दिवे बसविण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच काही दिवसापूर्वी नव्याने पथदिवे मोठ्या संख्येने बसविण्यात आले. त्याबाबत पालिका प्रशासनाचे सर्वप्रथम आभार. पण त्या पथदिव्याची येवून पाहणी केली तर बरे होईल. कारण पथदिव्यांची संख्या वाढली असली तरी जुन्या पथदिव्यांच्या तुलनेत या पथदिव्यांचा उजेड खुपच कमी आहे. त्यामुळे जुने पथदिवे होते ते परवडले, असा तक्रारीचा सूर स्थानिक रहीवाशांकडून आळविला जात आहे. हे पथदिवे संख्येने जास्त असले तरी रस्त्यावर या पथदिव्यांचा उजेड फारसा पडतच नाही. तुलनेने जुने पथदिवे संख्येने कमी, पण अधिक उजेड देणारे होते. नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यातील बलब, मक्युरी, हॅलोजन अथवा ठेकेदाराने जे काही बसविले असेल ते तात्काळ बदली करून रस्त्यावर अधिक उजेड कसा पडेल याबाबत आपण संबंधिताला निर्देश द्यावेत. जुन्या पथदिव्यांच्या तुलनेत नवीन पथदिव्यांचा उजेड अंधुक असून या पथदिव्यांबाबत तक्रारीचाच सूर आळविला जात आहे. हे चित्र केवळ नेरूळमध्येच नाही तर नवी मुंबईतील नव्याने बसविलेल्या पथदिव्यांबात सर्वत्रच दिसून येत आहे. पथदिव्यातून रात्रीच्या वेळी ऱस्त्यावर पुरेसा उजेड पडेल याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत व स्थानिक जनतेला दिलासा देण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.