स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा प्रभाग ३० मधील महिला व युवांची कौंटूबिक सहल उत्साहात पार पडली. भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फांऊंडेशन तसेच साईभक्त युवा यांच्यावतीने या कौंटूबिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग ३० मधील सानपाडा सेक्टर २,३,४,७,८,१०, पामबीचवरील १६ आणि १७ या परिसरातील २५० महिला आणि ५० युवा या कौंटूबिक सहलीमध्ये सहभागी झाले होते. शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता या सहलीला सानपाड्यातून सुरूवात झाली आणि सोमवारी, दि. २१ फेब्रुवारीला सहल पहाटे ५ वाजता सानपाड्यात परत आली. या कौंटूबिक सहलीमध्ये पन्हाळा किल्ला, रंकाळा तलाव, कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन, प्रतिबालाजी, एकमुखी दत्त दर्शन-नारायणपुर आदी धार्मिक ठिकाणांना व किल्ल्यांना भेट देण्यात आली. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्यांनी लेझीमची सलामी दिली. या सहलीमध्ये भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा शारदा पांडुरंग आमले स्वत: सहभागी होवून महिलांची व युवांची काळजी घेत होते.
महिलांना दररोज घर, कार्यालय, जबाबदारी, घरातील कामे, मुलांचे शिक्षण यातून थोडा विसावा मिळण्यासाठी व आपल्या परिचितांशी सहलीच्या माध्यमातून सुसंवाद घडावा यासाठी साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा शारदा पांडुरंग आमले व भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी ही सहल आयोजित केली होती.