नवी मुंबई : मुंबईतल्या आणि नवी मुंबईतल्या महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईतल्या शिक्षकांचा संघ असलेल्या ‘संजय इलेव्हन’ने नवी मुंबईतल्या शिक्षकांचा संघ असलेल्या ‘दुनियादारी इलेव्हन’चा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपदासह ‘शिक्षक चषक – नवी मुंबई’ पटकावला.
शिक्षक सातत्याने शिकवण्याचे काम करत असतात, विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत जावून मुलांच्या परिक्षेचे पेपर तपासण्याचे काम करावे लागते. अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना सुट्टीमध्ये प्रथम त्याचा अभ्यास करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोठेतरी विरगुंळा मिळावा, त्यांच्यातील क्रिकेटपटूला संधी मिळावी याहेतूने सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी मुंबईतील महापालिका शाळेतील शिक्षक व नवी मुंबई महापालिका शाळेतील शिक्षक यांच्यामध्ये ‘शिक्षक चषक – नवी मुंबई ’चे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबईतील महापालिका शाळेतील शिक्षकांचा संघ असलेल्या बीएमसी वॉरिअर्स ने स्पर्धा आयोजनात सहकार्य करताना आयोजकाची भूमिका निभावली. कैलास दळवी, प्रथमेश माने, विनय काबुगडे हे या स्पर्धेचे सहसंयोजक होते. या स्पर्धेत मुंबई व नवी मुंबईतील महापालिका शिक्षकांचे १६ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेतील अंतिम विजेते असलेल्या संजय इलेव्हन व स्थानिक सानपाडा पोलिस स्टेशन यांच्यात झालेल्या विशेष सामन्यातही संजय वॉरिअर्सने पोलिसांच्या संघावर मात केली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप, नवी मुंबई भाजपचे आयटी सेल संयोजक पंकज दळवी, भाजपचे तालुका महामंत्री रमेश शेटे, प्रभाग ७४ चे वॉर्ड अध्यक्ष रूपेश मढवी, अशोक विधाते, राजेश ठाकूर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संजय इलेव्हनला २१ हजार रूपये रोख व आकर्षक चषक भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते तर स्पर्धेतील उपविजेता संघ असलेल्या दुनियादारी इलेव्हनला ११ हजार रूपये रोख व आकर्षक चषक देण्यात आला., सानपाडा पोलिस स्टेशनच्या संघालाही आकर्षक चषकाने गौरविण्यात आले. स्पर्धेतील रोख पारितोषक आबा दळवी व पांडुरंग आमले यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी बक्षिस वितरणाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आपल्या भाषणात क्रिकेट खेळ व त्यांचे क्रिकेटवरील प्रेम जाहिर केले. आपण रणजी क्रिकेटपर्यत पोहोचलो होतो, पण अन्य साथ न मिळाल्यामुळे आपण पुढे वाटचाल करू शकलो नाही. त्यामुळे ज्या ज्या क्रिकेट स्पर्धांचे निमत्रंण येते, तेथे आपण आर्वजून उपस्थित राहत असल्याचे रामचंद्र घरत यांनी यावेळी सांगताना स्पर्धेतील क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष यादव, राजेंद्र पवार, नानासाहेब घोळवे, रविंद्र क्षीरसागर, ज्ञानेश्वर मंडपे, प्रविण पानसरे आदींनी परिश्रम केले.