इंधन दरवाढीसह महागाईचा युवा सेनेकडून निषेध
नवी मुंबई : स्वयंम न्युज ब्युरा
इंधनाच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यात सातत्याने होणारी दरवाढ व इंधन ददरवाढीमुळे पर्यायाने वाढत्या महागाईला लागणारा हातभार या सर्वांवर नियत्रंण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश असल्याने बेलापुर विधानसभा युवा सेनेकडून या इंधन दरवाढीचा व वाढत्या महागाईचा युवा सेनेचे बेलापुर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली आगळ्यावेगळ्या पध्दतीने निषेध करण्यात आला.
अक्षय तुतीयेला सोने खरेदी करण्याची हिंदू धर्मामध्ये पुरातन परंपरा असून सध्या इंधन दरवाढीचा वेग पाहता इंधनालाही सोन्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोलची भेट देताना युवा सेनेकडून इंधन दरवाढीचा निषेध करताना अक्षय तुतीया आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली. दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र दिनी निखिल मांडवे यांची युवा सेनेकडून बेलापुर विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नियुक्ती होताच निखिल मांडवे यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोफत इंधन वाटप कार्यक्रमाचे बेलापुर विधानसभा युवा सेनेकडून आयोजन करण्यात आले. पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर सहामधील पेट्रोलपंपावर जवळपास १२५ दुचाकी वाहनांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोल युवा सेनेकडून निखिल मांडवेंच्या नेतृत्वाखाली मोफत देण्यात आले.
यावेळी बेलापूर विधानसभा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विशाल ससाणे,उपविधानसभा युवा अधिकारी आशिष वास्कर, सिद्धाराम शिलवंत, बेलापूर विधानसभेचे चिटणीस प्रवीण कांबळे, सतीश वाघमारे, समन्वयक सचिन कवडे साहेब, सुशिल सूर्वे, बेलापूर विधानसभा सोशल मीडिया अधिकारी साईनाथ वाघमारे, विक्रांत विग, विभाग अधिकारी अजित खताळ, विनायक धनावडे, स्वप्नील भिलारे, संकेत मोरे, तसेच युवासेना पदाधिकारी व युवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.