जीवन गव्हाणे : ९८२०००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सुका कचरा व ओला कचरा या प्रकाराची जबाबदारी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला सोपवून स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांची मानसिक त्रासातून मुक्तता करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांना कचरा विलगीकरण करण्यास सांगितले जात आहे. विलगीकरणामुळे रहीवाशांनी सोसायटी आवारातील कचऱ्याचे सुका व ओला असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. तथापि सोसायटी आवारातील रहीवाशी कचरा विलगीकरण करत नसल्याने कचरा संकलन करणारे कर्मचारी व ठेकेदार संबंधित कचरा घेवून जात नाही. दोन दिवस कचरा घेवून न गेल्यास सोसायटी आवारात कचऱ्याचे ढिगारे तयार होतात. कचरा घेवून न गेल्यास रहीवाशी सामाजिक कार्यकर्त्यांकडे व माजी नगरसेवकांकडे या प्रकाराची तक्रार करतात. माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांना शिविगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत कचरा घेवून जाण्यास भाग पाडतात. यामुळे अनेकदा स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे. कचरा सोसायटीचा आणि वाहून नेण्याची जबाबदारी कचरा संकलन व वाहतुक करणाऱ्या ठेकेदाराची असे असतानाही या घटनेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकारी मधल्या मध्ये भरडला जात असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
घनकचरा व्यवस्थापन बड्या अधिकाऱ्याकडून तसेच ठेकेदाराकडून अतिरिक्त कचरा कॉम्पॅक्टर व टाटा एस वाहतूक करणाऱ्या गाड्यांची आवश्यकता आहे. परंतु असणाऱ्या गाड्याच नादुरुस्त वेळोवेळी होतात व त्यामुळे येथील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांना सकाळपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबून सदर गाडी रूटवर आणून कचरा उचलून घेतल्यानंतरच आपली जबाबदारीतून जावे लागते, हा सतत होणारा रोज होणारा मानसिक तसेच शारीरिक छळ सर्व स्वच्छता निरीक्षक यांना भोगावा लागत आहे. अतिरिक्त वाहन नसल्यामुळे आहे त्या वाहनांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या करून घेताना स्वच्छता निरीक्षक यांची दमछाक होत आहे अनावधानाने परिणामी सर्व लोकप्रतिनिधींचा रोषाचा सामना तसेच नागरिकांचा सामना स्वच्छता निरीक्षक यांना करावा लागत आहे त्याचबरोबर विभाग कार्यालयामधून अनेक नाहक कामे स्वच्छता निरीक्षक यांनाच लावली जातात आणि त्याची जबाबदारी निश्चित केली जाते. या सर्व प्रकारात स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकारी मोठ्या प्रमाणावर भरडला जात आहे, सर्वांचे मानसिक स्वास्थ्य देखील बिघडत चालले आहे यावर देखील लक्ष घालून संबंधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
वास्तविक पाहता कचरा विलगीकरणाची जबाबदारी कचरा वाहतुक करणाऱ्या ठेकेदाराची आहे. सोसायटीतील रहीवाशांना प्रशासनाकडून वरचेवर डब्बे पुरविले जात नाहीत. जुनाट व तुटक्या कचराकुंड्यामध्येच कचरा जमा करावा लागतो. याशिवाय कचरा वाहतुक करणारी वाहने जुनाट झाल्याने त्यातील कचरा गाडी जाताना रस्त्यावर पडतो. त्यामुळे बकालपणात वाढ होवून स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचरा वाहतुक करणाऱ्यांनाच कचरा विलगीकरणाचे निर्देश द्यावेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे ह कचरा वाहतुकदाराची जबाबदारी आहे. रहीवाशांच्या असंतोषाचा, माजी नगरसेवकांच्या तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या संतापाचा स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांना सामना करावा लागत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ ते १० वाजेपर्यत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकारी काम करताना पहावयास मिळतात. रस्ते, पदपथ, सोसायटी बाहेरील आवार येथे कोठे कचरा नाही ना, कचरा कुंड्या बाहेर नाहीत ना याची सतत पाहणी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर कचरा विलगीकरणाची जबाबदारी कचरा वाहतुक करणाऱ्या ठेकेदारांकडे वर्गीकृत करून स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता अधिकाऱ्यांची होणाऱ्या मानासिक त्रासातून मुक्तता करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.