नवी मुंबई : प्रभाग ३५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. गेली अनेक वर्षे नगरसेवक गिरीश म्हात्रे व नेरूळ गावातील गणेश नाईकांचे समर्थंक आणि नेरूळ गावचे ग्रामस्थ यांच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सतकाराचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी फक्त कार्यक्रमाच्या स्वरूपात थोडा बदल करून विद्यार्थ्यांसोबत प्रभागातील जेष्ठ नागरिकांचा समाजाप्रती त्यांचा असलेल्या योगदानाचा सन्मान व्हावा, कौतुक व्हावा म्हणून त्यांचा ही सत्कार सोहळा सोबत आयोजित केला गेला होता.
निरंत पाटील भाऊ यांच्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक ३५ भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक तसेच माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आपण वर्षभर घेतलेल्या मेहनतीच्या दखल घेत त्यांची प्रशंसा करत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरही जाणवत होता. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळात समाजासाठी भरीव योगदान दिले, ज्यांच्या संस्कारामुळे आजची युवा पिढी यशस्वी वाटचाल करीत आहे, त्या जेष्ठ व्यक्तींचा ही आदर सन्मान आपल्याकडून होत आहे ही भावना सर्व आयोजकांना आनंद देणारी होती.
आमदार गणेश नाईकांसोबत व्यासपीठावरील मान्यवरांनी मांडलेले मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी निश्चितच मार्गदर्शक राहतील, असे यावेळी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. प्रभागातील विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती सदर कार्यक्रमाची भव्यता आणि यशस्विता दर्शवत होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर भोपी, गणपत बुवा भोपी, देवनाथ म्हात्रे, अक्षय पाटील, जयंत म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, प्रितेश पाटील, जयेश ठाकुर, संकल्प पाटील तसेच प्रभाग क्रमांक ३५ भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त जेष्ठ सदस्य. महिला कार्यकर्त्या तसेच भूमिपुत्र एन्टरटेंमेंट, संकल्प चॅरीटेबल चे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.