नवी मुंबई : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात नवी मुंबईतील मोटार ट्रेनिंग स्कुलचे मालक व कर्मचारी यांच्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने मोटार ट्रेनिंग स्कुलचे मालक व कर्मचारी सहभागी झाले होते.
या महा आरोग्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई मोटार ट्रेनिंग स्कुल मालक सघंटना व अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. धावपळीच्या काळात इतरांना मोटर ट्रेनिंग देताना स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, हीच उदासिनता भविष्यात गंभीर आजाराला निमत्रंण देते, यामुळे कुटूंबाचीही वाताहत होते, हे पाहून भविष्यातील हानी टाळण्यासाठी या महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक दिलीप आमले यांनी यावेळी दिली.
यावेळी दिलिप आमले यांचे ‘व्यसन मुक्तीवर मोफत जन जागृती’ या विषयावर संवाद झाला. व्यसनामुळे आपल्या शरीरातील अवयव कसे कमजोर होऊन आजारपण येते. यामुळेच संसाराची कशी धुळधाण होते, या विषयावर चालकांशी संवाद साधून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये रुग्णअलयाचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश वाडकर, मधुकर चव्हाण, श्री ओम मुनेश्वरचे अनुप आचरेकर, त्रिमुर्ती महिला मडंळाच्या अध्यक्षा संगिता आमले, नाना जगतापसह रिक्षा युनियन पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.