नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर ८ मधील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या हुतात्मा बाबु गेनू मैदानावर या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दिवसेंदिवस या मैदानावर दांडिया तसेच गरबा खेळण्यासाठी गर्दी वाढत चालली आहे. या नवरात्रोत्सवात बेलापुरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे याही सहभागी झाल्या होत्या.
बेलापुरच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या उत्सवात सहभागी होत अखेरच्या दोन दिवसात आपण पुन्हा या ठिकाणी येणार असल्याचे यावेळी सानपाडावासियांना सांगितले. भाजपचे आयटी सेल संयोजक सतीश निकम, भाजयुमोच्या नवी मुंबई महिला अध्यक्षा सुहासिनी नायडू यांच्यासह मुंबई, पनवेल, उरण , ठाणे तसे स्थानिक नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी या उत्सवात दररोज मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
भाजप सानपाडा प्रभाग ३० आणि भाजपाचे सानपाड्यातील नेते पांडुरंग आमले यांच्या विद्यमाने सानपाडा सेक्टर ८ येथे नवरात्रोत्सवची धून आर.के.नाईक इव्हेंटसच्या माध्यमातून सानपाडावासियांना पहावयास मिळत आहे. २६ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा उत्सव ४ ऑक्टोबरपर्यत सुरू राहणार आहे. सानपाडा सेक्टर ८ मधील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या हुतात्मा बाबु गेनू मैदानावर या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांपैकी एका महिलेला दररोज मानाची पैठनी देण्यात येत आहे. शेवटच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉमध्ये विजेत्या महिलेस सोन्याची नथ देण्यात येणार आहे. ग्रुप डान्ससाठी प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे देण्यात येत असून साई भक्त सेवा मंडळ, साई भक्त महिला फाऊंडेशनकडून या उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात सानपाडा व जुईनगर नोडमधील रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.