संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : किल्ले बनवण्याच्या कलेला महत्व यावे आणि आपल्या संस्कृतीचे महत्व वाढावे, यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी येथे केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभुमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा येथे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी परेश ठाकूर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी किल्ले स्पर्धेच्या पोस्टरच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचीता लोंढे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, खजिनदार संजय जैन, युवानेते केदार भगत, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, विवेक होन, उदित नाईक, भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक भोपी, रोहित कोळी, अक्षय सिंग, देवांशु प्रभाळे, नुतन पाटील, नितेश घुगे, अर्जुन भगत, अनिकेत भोईर, श्रावण घोसाळकर, विशांत सपालीया, सिद्धार्थ मोहिते, शुभम कांबळे, अजित सिंग, सिद्धेश खानावकर, रवी संदेपॉल, करण सोनवणे, रोहन माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.