अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १८ मध्ये महापालिकेचे आरोग्य विभागाचे नागरी आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरु करण्याची लेखी मागणी भाजपच्या प्रभाग ९६ मधील माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर १८, १८ए व २४ परिसरातील रहीवाशांना आरोग्य सुविधेसाठी कुकशेतमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे अथवा १५ ते २० मिनिटांची पायपीट करावी लागत आहे. त्यांना स्थानिक परिसरात आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. मलेरिया, ताप, डेंग्यूचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. कोरोनाचे सावटही पसरु लागले आहे. त्यामुळे १८, १८ए व २४ परिसरातील रहीवाशांच्या आरोग्य सुविधेसाठी सेक्टर १८ परिसरात नागरी आरोग्य केंद्राचे उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.