अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबईतील महापे येथे पार पडले. या अधिवेशनात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आणि एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनाबंधणीवर जोर देण्याचे निर्देश देताना जनसेवेच्या माध्यमातून जनाधार वाढविण्याचे निर्देश दिले.
महापे येथील रमाडा हॉटेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाला एमआएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, तसेच देशतील १८ राज्याचे प्रदेशाध्यक्ष, आमदार, नगरसेवक व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी केले होते. या आयोजनात बिलाल जलील साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीत असदुद्दीन ओवेसी यांनी येणाऱ्या काळातील स्थअनिक स्वराज्य संस्था, त्यापाठोपाठ लोकसभा व विधानअभा निवडणूकांबाबत मार्गदर्शन करताना राजकीय घडामोडीबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमआयएमचे महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शहानवाज खान यांच्या नेतृत्वात नवी मुंबई विद्यार्थी आघाडी महासचिव समीर शेख व टीम – नाझीम शहा, आरिफ शेख, वसीम शेख व आझाद अन्सारी या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आपले योगदान दिले. या कार्यक्रमात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांचा एमआयएमचे विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. कुणाल खरात, प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान व नवी मुंबई महासचिव शेख समीर यांनी छोटेखानी सत्कार केला.