अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : डासांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रभाग ३० मधील गटारांची तातडीने तळापासून सफाई करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उपद्रवाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. साथीचे आजार पसरणे, सांयकाळी दारे-खिडक्या बंद करुन बसणे, सोसायटी आवारात डासांमुळे वावरता न येणे या प्रकारामुळे सानपाडा नोडमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सानपाडा नोडमधील रहीवाशांना दिलासा देण्यासाठी प्रभाग ३० मध्ये व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान सातत्याने राबविणे आवश्यक आहे. स्थानिक रहीवाशी डासांच्या वाढत्या त्रासाबाबत आमच्या जनसंपर्क कार्यालयात सतत तक्रारी करत असल्याने ही तक्रार करत असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
या डासांना गटारांमुळे पोषक वातावरण मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी गटारांची एकदा सफाई होते. परंतु दर तीन महिन्याने गटारांची तळापासून सफाई होणे आवश्यक आहे. ज्यायोगे पाणी तुंबणार नाही. गाळ, माती साचणार नाही व डासांना पोषक वातावरण मिळणार नाही. पावसाळी पूर्व कामांमध्ये आपण एप्रिल अखेरिस अथवा मे महिन्यात नाहीतर जूनच्या पहिल्या आठवड्यात गटारांची सफाई कराल. परंतु सध्या डासांचा वाढता त्रास पाहता प्रभाग ३० मधील सर्वच गटारांची युद्धपातळीवर तळापासून सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.