अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पालिका सेवेत असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणारी व वेळ पडल्यास संघर्ष करणारी महाराष्ट्र कर्मचारी युनियन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कार्याची दखल घेत सत्कारही करते, हे गुरुवारी सांयकाळी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पहावयास मिळाले.
महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयात युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते तसेच नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी घेण्यात आला. या कार्यक्रमास पालिका कर्मचारी व अधिकारी तसेच युनियनचे
सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहन विभागातील वाहन चालक किशोर गोतारणे हे महापालिका प्रशासनात २९ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झाले. ते महापालिकेच्या आरोग्य विभागात वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. जवळपास तीन दशके पालिका प्रशासनात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून वाहन विभागाच्या दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना रुग्णावाहिकेच्या प्रतिकृतीची भेट देण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजाविणाऱ्या भरत महाडकर यांचा महापालिका प्रशासनाने सत्कार केला होता, त्या महाडकरांच्या कार्यांची दखल घेत आजच्या कार्यक्रमात युनियनच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच वाहन विभागातील वाहन चालक सुशील तांबे यांची लिपिक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कामगार नेते रवींद्र सावंत, वाहन युनिटचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, उपाध्यक्ष कृष्णा घनवट, किशोर नाईक, रतन धूम, संजय पाटील, नंदकुमार गोपी, दादासो खंडागळे, विनोद पगारे, तानाजी किरवे, महेश ढवळे अमित माळगावकर, संजय रांधवन, बापू कदम, प्रकाश भोईर, सुनील कापडणे, प्रवीण जाधव, प्रशांत गमरे, नितीन देशमुख, नदीम पटेल, सुनील लोंढे इत्यादी उपस्थित होते.