नवी मुंबई : सानपाडा सेक्ट९ मधील महापालिकेच्या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरुस्ती करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ९ मधील भुखंड क्रं ३ येथे महापालिकेचे क्रिडांगण असून त्या क्रिडांगणाला महापालिका प्रशासनाकडून झाशीची राणी खेळाचे मैदान असे नाव आहे. क्रिडांगणात प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावरच महापालिका प्रशासनाकडून क्रिडांगणाचा नामफलकही बसविण्यात आला आहे. परंतु या नामफलकातील राणी हा शब्द निखळून पडला असल्याने नामफलकावर केवळ झाशीची खेळाचे मैदान असा उल्लेख आहे. १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम गाजविणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव या क्रिडांगणाला देण्यात आले असल्याने त्या नामफलकाची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. ‘क्या खूब लढी मर्दानी , वो तो झॉसीवाली राणी थी’ या नुसत्या जयघोषानेही अंगावर आजही शहारे उमटतात. राणी हा शब्द गळून पडल्याने सानपाडावासियांनी मोठ्या प्रमाणावर आमच्या कार्यालयात येवून नाराजी व्यक्त केली आहे. झाशीची राणी या नावाशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या असल्याने तात्काळ त्या नामफलकाची दुरुस्ती करुन त्या ठिकाणी राणी हा शब्द बसविण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी माथाडी नेते व भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.