कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशकांच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो’ आंदोलन
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना गुजरातमधील सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याचा निषेधार्थ नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ‘जेल भरो’ आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला.
राहूल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या निषेधार्थ देशात सर्वत्र कॉंग्रेस पक्षाकडून निदर्शने व आंदोलने करण्यात आली. नवी मुंबईतही सुरत न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद तात्काळ उमटले. जिल्हाध्यक्ष अनिल कौशिकांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस रस्त्यावर उतरली. वाशी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडत आपले आंदोलन सुरु केला. केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत असल्याचे सांगत कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी भाषणातून आपला संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावल्याचे वृत्त समजताच दिघा ते बेलापुरदरम्यानचे कॉंग्रेसचे नवी मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, नगरसेविका वाशीतील कॉंग्रेस भवनात जमा झाले. सांयकाळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस भवनापासून वाशी पोलिस ठाण्यापर्यंत चालत मूक मोर्चा काढला व वाशी पोलिस ठाण्यात गेल्यावर तिथेच ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजीला प्रारंभ झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात राहूल गांधी यांची लोकप्रियता वाढत चालल्याने केंद्र सरकार हे सुडबुद्धीचे राजकारण करत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी यावेळी केला. या जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील ‘जेलभरो आंदोलनात’ नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष, नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अद्यक्ष तसेच कामगार नेते व प्रवक्ते रवींद्र सावंत, जवाहरलाल मंच सेल महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा ना लिमये, प्रदेश प्रवक्ता नासिर हुसेन, माजी नगरसेविका मीरा पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर, संध्या कोकाटे, राखी पाटील, सेलचे अध्यक्ष रितेश तांडेल, माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड, ज्ञानदीप सिंग चंडोक, सुनील पारकर, विनोद पाटील, विजय पाटील, दिलीप नागपाल ,बालाजी साळवे, भरत माळवे, अभिजीत काकडे, आबा सोनवणे, सुरेंद्र प्रसाद यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.