अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
- क्रिडांगणाचे सुशोभीकरण करून बकालपणा घालवा
- मॉर्निग वॉकसाठी तसेच चालण्यासाठी मार्गिका करा
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ३ मधील महापालिकेच्या मारूती पन्हाळकर या क्रिडांगणाचे सुभोकरण करून त्यात ओपन जीम आणि मॉर्निग वॉक तसेच चालण्यासाठी मार्गिका वॉक (ट्रॅक) बनविण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ३ परिसरात महापालिकेचे मारूती पन्हाळकर क्रिडांगण आहे. या मैदानासभोवताली सिडको वसाहतीमधील गृहनिर्माण सोसायट्या आहे. या मैदानाची डागडूजी तसेच देखभाल व सुशोभीकरण करण्यास महापालिका प्रशासनाने उदासिनता दाखवत चालढकल केलेली आहे. यामुळे आजमितीला मैदानाला दुरावस्था आलेली असून मैदानाचा स्थानिक नागरिकांना लाभही मिळत नाही. या मैदानाचे पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील रहीवाशांच्या मागणीस्तव या ठिकाणी व्यायामासाठी, शरीर संवर्धनासाठी ओपन जीम क्रिडांगणात उपलब्ध करुन द्यावी. तसेच मॉर्निग वॉकसाठी तसेच सांयकाळी चालण्यासाठी या क्रिडांगणात मार्गिका वॉक (ट्रॅक) साठी मार्गिका बनविण्यात यावी. समस्येचे गांभीर्य व पालिका प्रशासनाने आजवर दाखविलेली उदासिनता. मैदानाच्या दुरावस्थेमुळे परिसराला आलेला बकालपणा, ओपन जीम व मॉर्निग वॉकसाठी मार्गिकासाठी स्थानिकांकडून होणारी आग्रही मागणी पाहता आपण संबंधितांना क्रिडांगणाचे सुशोभीकरण करण्याचे आणि मॉर्निग वॉकसाठी मार्गिका व ओपन जीमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.