नवी मुंबई : पावसाळा दोन महिन्यावर आला असल्याने नेरूळ सेक्टर १६, १६ ए व १८ या विभागातील पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करण्याची लेखी मागणी भाजपच्या प्रभाग ९६ मधील माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
महापालिका नेरूळ विभाग कार्यालयातंर्गय नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या परिरसराचा समावेश होत आहे. दोन महिन्यावर पावसाळा आला आहे. पावसाळीपूर्व कामांना महापालिका प्रशासनाने लवकर सुरुवात केल्यास कामे प्रभावीपणे करणे शक्य होईल, यासाठी सौ. रुपाली भगत यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले आहे.
नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील पावसाळीपूर्व कामांविषयी निवेदनातून या विभागातील सर्व पदपथांची पाहणी करून ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले गेले असतील, तेथे नवीन बसविणे, ज्या ठिकाणी भाग दबला गेला असेल तिथे माती टाकून सिमेंटचा कोबा करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे. या विभागात पाऊस पडल्यावर थोड्याचा दिवसात पदपथावर शेवाळ साचते. मागील वर्षी अनेक जण शेवाळामुळे अनेक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक घसरून पडल्यावर त्यांना जखमा झाल्या आहेत. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच भागातील पदपथावर पावसाळा कालावधीत किमान तीन ते चार वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी. तसेच पदपथावर शेवाळ साचणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळा कालावधीत झाडांच्या ठिसूळ फांद्या पडल्याने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरु झाल्यावर वृक्षछाटणी न करता आतापासून नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील वृक्षांची पाहणी करून ठिसूळ झालेल्या व रस्त्यावर आलेल्या धोकादायक फांद्यांची आताच छाटणी करून घ्यावी. नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील पथदिव्याबाबत पाहणी अभियान राबवुन बंद स्थितीत असलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. ब्लब बदली करावेत. कुठे वायरी बाहेर आल्या असतील तर त्या बंदीस्त कराव्यात. रस्त्यावर, पदपथावर खुल्या स्थितीत असलेल्या विद्युत केबल्स भूमिगत कराव्यात. सर्व पथदिवे सुस्थितीत राहतील याला युद्धपातळीवर प्राधान्य देण्यात यावे. पावसाळा सुरु झाल्यावर नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्या तुंबूंन ड्रेनेजच्या झाकणातून मलयूक्त पाणी बाहेर वाहत असते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ते पाणी अंगावरही उडते. त्यामुळे नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील सर्व मल:निस्सारण वाहिन्यांची तळापासून सफाई करून सर्व चोकअप काढल्यास पावसाळ्यात कोणतीही समस्या निर्मांण होणार नाही. पावसाळा कालावधीत पावसाळीपूर्व कामांचा भाग म्हणून गटारांची तळापासून सफाई करण्यात यावी. ती वरवर नसावी. तळापासून चिखल, गाळ व अन्य साहीत्य काढल्यास गटारे पावसाळा कालावधीत चोकअप होणार नाहीत. अनेकदा पावसाळा कालावधीतच रस्त्यांची डागडूजी सुरु होते. खड्डे बुजविले जातात. डांबरीकरण केले जाते. परंतु याचा काहीही फायदा होत नाही. पालिका प्रशासनाच्या पैशाचा अपव्यय होतो. पाऊसात डांबर वाहून जाते अथवा डांबरी पट्ट्या उखडल्या जातात. त्यामुळे आताच रस्त्यांची डागडूजी केल्यास कोठे पुन्हा खड्डे पडल्यास त्यावर उपाययोजना करता येईल, ज्यायोगे नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील रहीवाशांना कोणताही त्रास होणार नाही, या कामांचा माजी नगरसेविका सौ. रुपाली भगत यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
या निवेदनातून नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील समस्या मांडताना सौ. रुपाली भगत यांनी पावसाळ्यात समस्यांचा उद्रेक होऊन दुर्घटना होऊ नये म्हणून समस्यांचे गांभीर्य आताच निदर्शनास आणून देत आहोत. आपण ही कामे करण्यासाठी संबंधितांना आताच निर्देश देवून नेरूळ सेक्टर १६, १६ एआणि १८ या विभागातील जनतेला दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.