श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर चारमध्ये वाधवा टॉवरकडून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर लघुशंकेसाठी छोटेखानी शौचालयाची तातडीने निर्मिती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार परिसरात वाधवा टॉवरकडून स्मशानभूमीमार्गे सेक्टर दोन येथील एलआयजी परिसराकडे अथवा जुईनगरला जाता येते. वाधवा टॉवरकडून निघाल्यावर स्मशानभूमीकडे जाताना आपल्या पालिका नेरूळ विभाग कार्यालयाकडे जाता येते. वाधवा टॉवर ते स्मशानभूमी मार्गावर ठिकठिकाणी पुरुष, मुले, ज्येष्ठ नागरिक लघुशंका करताना बाराही महिने पहावयास मिळतात. सकाळी व रात्री या मार्गावर वॉकसाठी ये-जा करणाऱ्या महिलांना तसेच सेक्टर चारमधील पालिका शाळेत आणि सेक्टर दोनमधील खासगी शाळेतील ये-जा करणाऱ्या मुलींना आणि शिक्षिकांना खाली मान घालून वावरावे लागते. त्यामुळे खुलेआमपणे उघड्यावर होणाऱ्या लघुशंकेच्या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी सुटते, बकालपणा होतो आणि तेथून पायी जाणाऱ्या महिलांची , मुलींची मानसिक कुचंबनाही होत आहे. पालिका शाळेकडे वळसा मारताना ज्या ठिकाणी नाला संपतो, त्याठिकाणी कोपऱ्यावर पदपथावर मोकळी विस्तीर्ण जागा आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने पुरूषांना लघुशंकेसाठी छोटेखानी शौचालय उभारल्यास या समस्येचे निवारण होईल. महिला वर्गांची कुचंबना होणार नाही. महिलांना तेथून खाली मान घालून ये-जा करावी लागणार नाही. बकालपणा थांबेल, दुर्गंधी येणार नाही. रस्त्यावर होणारे लघुशंकेचे गलिच्छ प्रकार थांबतील. समस्येचे गांभीर्य व महिला वर्गांची मागणी पाहता त्या ठिकाणी लघुशंकेच्या सुविधेसाठी संबधितांना तातडीने छोटेखानी शौचालय उभारण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.