अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ आणि जुईनगर नोडमधील नागरी समस्यांचे निवारण करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील नागरी समस्या सोडविण्यासाठी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी नेरूळ व जुईनगर नोडमधील समस्यांबाबत रविंद्र सावंत यांनी निवेदन सादर केले.
१) नेरूळ सेक्टर ४ ते सानपाडा (वाधवा टॉवर ते पामबीच मार्गालगत असलेले केसर सॉलिटर)दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे.
२) नेरूळ स्टेशन पश्चिमेस पदपथावर भिकारी व इतरांनी निवासी वास्तव्य बनविले आहे. यामुळे स्टेशन परिसराला बकालापणा आला असून स्वच्छता अभियानाला गालबोट लागले आहे. स्टेशनबाहेरील भिकाऱ्यांचे पदपथावरील वास्तव्य हटवून येथील बकालपणा नष्ट करावा. त्या ठिकाणी कुंड्या ठेवून सुशोभीकरण करण्यात यावे. पालिका व सिडको या कामासाठी हद्द हे कारण सांगत टोलवाटोलवी करत आहेत. आपण सिडकोचे पदसिद्ध संचालक असल्याने आपण याकामी पुढाकार घ्यावा.
३) सेक्टर ४ व सेक्टर ६ मधील चौकात सातत्याने होत असलेल्या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्यात यावा. येथील हॉटेल व अन्य खाद्यविक्रेत्यांमुळे वाहन पॉर्किग रस्त्यावरच होत असल्याने वाहतुक कोंडी निर्माण होत असते. येथील वाहतुक कोंडीवर ठोस तोडगा काढण्यात यावा.
४) राजीव गांधी उड्डाणपुलावर या उड्डाणाचा ‘राजीव गांधी उड्डाणपुल’ असा नामफलक पुलावर लावण्यात यावा.
५) नेरूळ सेक्टर २ इस्टर्न गॅलरिया व नेरूळ सेक्टर ८ समाधान हॉटेलदरम्यान ये-जा करण्यासाठी रस्ता ओंलाडावा लागतो. येथून रहदारी जास्त असल्याने अनेकदा रस्ता ओंलाडणे महिला, शालेय मुले व ज्येष्ठ नागरिक यांना अवघड होते. यामुळे अपघातही घडले आहेत. या ठिकाणी रस्त्या ओंलाडण्याकरिता ये-जा करण्यासाठी भुयारी पादचारी मार्ग बनवावा अथवा रस्त्यावर फ्लाय ओव्हर ब्रीज पादचाऱ्यांसाठी बनवावा.
निवेदनात नेरूळ व जुईनगर नोडमधील समस्यां मांडताना या नेरूळ नोडमधील नागरी समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.