अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंर्तगत भागात महावितरणकडून रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामाबाबत महावितरणच्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत भागात महावितरणच्या ठेकेदाराकडून २० मे २०२३ पासून खोदकाम सुरू आहे. गेली आठ दिवस हे काम सुरू आहे. हे काम करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची महावितरणच्या ठेकेदाराने परवानगी निश्चितच घेतलेली नसणार. महापालिकेच्या परवानगीशिवाय आठ दिवस खोदकाम सुरू आहे. प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीलगतच्या महावितरणच्या डीपीपासून दर्शन दरबार तसेच सेक्टर सहाच्या अंर्तगत भागात मोठ्या प्रमाणावर खोदकाम केलेले आहे. याचा अर्थ नेरूळ विभाग कार्यालयाला कोठे खोदकाम आठवडाभर सुरू आहे यावी कोणालाही माहिती नाही अथवा महावितरणचा ठेकेदार नेरूळ विभाग कार्यालयाला जुमानत नसावा. या खोदकामामुळे परिसराला बकालपणा आलेला आहे. खोदकाम करूनही जाड आकारातील विद्युत केबल्स जमिनीवर आलेल्या स्पष्टपणे आपणास प्लॉट १५ वरिल शिवम सोसायटीच्या प्रवेशद्वारावर दिसत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
आजही नेरूळ सेक्टर सहामध्ये खोदकाम सुरूच आहे. आपणास प्लॉट ३०७-३०८ वरील गोदावरीच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारलगत काम सुरू आहे. आपणास ते फोटो पाठवित आहे. पालिकेची परवानगी न घेता २० मे २०२३ पासून सुरू असलेल्या खोदकामाबाबत २२ मे व २३ मे रोजी आपणाकडे व नेरूळ विभाग कार्यालयाकडे लेखी तक्रारीही केल्या आहेत. २३ मे रोजी केलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी आपण आमचे निवेदन
: | City Engineer <cityengineer@nmmc.gov.in>, DMC Zone 1 <dmc_zone1@nmmc.gov.in> |
यांना फॉरवर्ड केले. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आजही बिनधास्तपणे महावितरणच्या ठेकेदाराचे खोदकाम सुरूच आहे. पालिका आयुक्तांच्या फॉरवर्ड केलेल्या पत्रावर कारवाई करण्यास
: | City Engineer <cityengineer@nmmc.gov.in>, DMC Zone 1 <dmc_zone1@nmmc.gov.in> |
पालिका अधिकारीच टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या ठेकेदाराला परवानगी न घेता खोदकाम करून परिसर बकाल करणाऱ्यास पालिका प्रशासनाचेच अधिकारी खतपाणी घालत आहेत. विद्युत केबल्सही वरच्यावर झाकण्यात आल्या आहेत. खोदकामावर आठ दिवस झाले तरी डागडूजी अथवा डांबरीकरण झालेले नाही. उद्या खोदकामातील उघड्यावर असलेल्या विद्युत केबल्स सदोष असल्यास त्याचा पावसाच्या पाण्याशी संपर्क येवून कोणी दगावल्यास महावितणच्या ठेकेदारासह नेरूळ विभाग अधिकारी व आपण निवेदन फॉरवर्ड करूनही दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधावा गुन्हा दाखल करण्यात येईल. विनापरवानगी खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर पालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी विद्युत केबल्स वरचेवर नाही तर खाली काही प्रमाणात टाकण्याचे निर्देश देण्याची मागणी संदिप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.