पत्रकार संदीप खांडगेपाटील यांचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना साकडे
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या जमिनीत भूसंपादन झालेले नसतानाही तसेच शासन दफ्तरी कोठेही नोंद नसतानाही पोलीसी बळावर दोघा वयोवृद्ध भावांच्या जमिनीतील अतिक्रमित तब्बल २६ गुंठे जमिनीतील रस्त्याची डागडूजी, खडीकरण, डांबरीकरण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून या दोघा वयोवृद्ध शेतकरी भावांना न्याय देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्यातील भाजपचे मातब्बर नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील उत्तम विष्णू खांडगे (७६ वर्षे वय), चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७०) या दोन शेतकऱ्यांच्या नारायणगाव-जुन्नर रोडवरील गट क्रमांक ३०८/१ जमीनीतील अतिक्रमण झाले असून कोणत्याही प्रकारचा मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. २०१३-१४ सालीही धाकधपटशा व दंडेलशाहीच्या बळावर प्रशासनाने या दोन भावाच्या शेतात अतिक्रमण करून पायवाटेचे मोठ्या रस्त्यात रूपांतर करून डांबरीकरण केले होते. या रस्त्याची कोठेही प्रशासन दरबारी नोंद नाही. गावात तीन शासकीय रस्ते याअगोदरच नारायणगाव –जुन्नरला उपलब्ध असून या दोन शेतकऱ्यांच्या जमिनित काही घटकांनी दडपशाही करून या दोन शेतकऱ्यांच्या तब्बल २६ गुंठे जमिनीचे नुकसान करण्यात आलेले आहे. भूसंपादन केले नसल्याची कबुली प्रशासन देत आहे. दोघे शेतकरी बंधू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयीन पातळीवर संघर्ष करत आहेत. भूसंपादन नाही, शेतकऱ्यांना मोबदला नाही. कागदावर या रस्त्याची नोंद नाही. सर्व बेकायदेशीर असतानाही या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुन्हा एकवार जिल्हा परिषद डागडूजी करत असल्याचा प्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगळवारी, दिनांक ३० मे रोजी सकाळी ११ वाजता ठेकेदाराचा जेसीपी थेट चंद्रकांत विष्णू खांडगे व उत्तम विष्णू खांडगे यांच्या शेतात उभा राहीला. (आमचे ते शेतच आहे. सातबाऱ्यावर सर्व जमिनीचॅी नोंद आहे. कागदोपत्री शेत आहे. रस्त्याचा उल्लेख नाही. भूसंपादन झाले नसल्याचे जिल्हा परिषद सांगत होती. पूर्वी तेथे केवळ पायवाट होती. नंतर बैलगाडी जाण्याची जागा ग्रामस्थांनी केली व आता थेट पुन्हा एकवार डांबरी रस्ता. दोघा भावांच्या तब्बल २६ गुंठे जागेचे नुकसान झाले आहे. हा शासकीय रस्ता नाही. कागदोपत्री उल्लेख नाही)
. जेसीपी येवून उभा राहील्यावर मी, माझे वयोवृद्ध वडील उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७६), माझी आई सौ. रत्नप्रभा उत्तम खांडगे (वय वर्ष ७१), माझी पत्नी सौ. सुवर्णा संदीप खांडगे (वय वर्ष ४२), माझा चुलत भाऊ संजय चंद्रकांत खांडगे (वय वर्ष ३१) असे आम्ही घरातील पाचही जण जेसीपीबाबत विचारणा करावयास गेल्यावर व तसेच या जागेवरील रस्त्याचे कामाबाबत कागदपत्रांची विचारणा केली. शेताच्या कोपऱ्या शेडमध्ये पोलिसी बळ उपलब्ध होते. काम जिल्हा परिषदेचे व पोलीस बंदोबस्ताचा शुल्काचा दोन दिवसाचा भरणा ग्रामपंचायतीने केला आहे. याचाच अर्थ या दोन शेतकऱ्यांच्या परिवाराला संपविण्यासाठी, त्यांच्या शेतातील २६ गुंठे जमिनीची कायमस्वरूपी वासलात लावण्यासाठी जिल्हा परिषद, पोलीस, ग्रामपंचायत या यंत्रणा जणू काही विडा घेवूनच सज्ज झाल्या आहेत. पुन्हा या जमिनीबाबत आपल्या कार्यालयास सांगू इच्छितो, ही जमीन आमची असून प्रशासन अतिक्रमण करत आहे. या कामासाठी कंबर कसून सज्ज असलेल्या सर्वच यंत्रणांवर अतिक्रमण कायदा लागू करून कारवाई होणे आवश्यक आहे. मी व माझ्या परिवाराने वारंवार मागणी करून दुपारी ४ वाजेपर्यत कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून दिले नाही. कामाचा माहितीफलक कामाच्या ठिकाणी आवश्यक असतानाही ठेकेदाराने लावलेला नाही. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना सर्व माहिती सांगतोय, हा शासकीय रस्ता नाही, हे अतिक्रमण आहे. कागदोपत्री नोंद नाही. शेतकऱ्यांना कोणतीही कागदोपत्री माहिती दिलेली नाही. न्यायालयीन प्रकरण असताना व या केसबाबत स्टे नसताना तसेच कामासाठी परवानगी दिलेली नसतानाही काम कसे होत आहे याची विचारणा केली असताना त्यांनी थेट माझ्यासह माझ्या वयोवृद्ध आईवडील, पत्नी व भावाला अटक करण्यासाठी पोलिसांना वारंवार निर्देश दिले. सतत आमच्या अटकेबाबत परदेशी यांनी पोलिसांना सूचना केल्या. काम होणारच असे परदेसी सांगत होते. न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना तसेच आमच्या शेतात कोणत्याही प्रकारचे भूसंपादन झालेले नसताना (केवळ माणूसकी म्हणून आमच्या घरच्यांनी पायवाटेसाठी तोंडी संमती दिलेलि असताना थेट रस्ता. हे कोणत्या कायद्यात बसते. दोघा शेतकऱ्यांनी व त्यांच्या परिवाराने नैराश्येच्या गर्तेत जीवाचे बरेवाईट केल्यावर अथवा त्यांना मानसिक धक्का बसून कोणी मेल्यावर या परिवाराला न्याय भेटणार का?)
परदेसी या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांने पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या अतिक्रमणाची पुन्हा एकवार डागडूजी करून चंद्रकांत विष्णू खांडगे व उत्तम विष्णू खांडगे या दोन परिवाराची मुस्कटदाबी केली आहे. आपण याप्रकरणी सखोल चौकशी करावी. या शेताचे भूसंपादन झालेले नाही. गावात अन्य तीन शासकीय रस्ते दळणवळणासाठी उपलब्ध असतानाही केवळ गर्भवती महिला, शालेय मुले आदी सांगून ग्रामपंचायत कार्यालयही दिशाभूल करत आहे. गावात किती गर्भवती महिला आहेत आणि किती शालेय मुले येथून ये-जा करतात याचीही मोजदाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडे वाहन आहे. अन्य कागदोपत्री देखील उपलब्ध असलेल्या व डांबरीकरणासह सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या वापराबाबत आग्रह धरणे आवश्यक असताना केवळ आमच्या जमिनीत अतिक्रमण करून २६ गुठ्यांवर बेकायदेशीर रस्ता उभारणी कशासाठी? जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांनी दि. ३० जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील उत्तम विष्णू खांडगे (७६ वर्षे वय), चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७०) या दोन शेतकऱ्यांच्या नारायणगाव-जुन्नर रोडवरील जमीनीत भूसंपादन झालेले नसतानाही व कागदोपत्री नोंद नसलेल्या, शेतकऱ्यांना एक रूपयाचाही मोबदला न देता पोलीसी बळावर रस्त्याची डागडूजी केली आहे. मुळातच अन्य ठिकाणी निधी मंजूर करून याठिकाणी वापरण्याचा प्रकार यापूर्वी झाला असून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. परदेसी यांनी पदाचा गैरवापर करत पोलीसांच्या उपस्थितीत हे बेकायदेशीर कृत्य दिवसाउजेडी केले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भूसंपादन न झालेल्या व प्रशासन दरबारी नोंद नसलेल्या पायवाटेची (नंतर २०१३ रोजी धाकधपटशा दाखवून केलेले डांबरीकरण) डागडूजी करत डांबरीकरणाचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील उत्तम विष्णू खांडगे (७६ वर्षे वय), चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७०) या दोन शेतकऱ्यांच्या नारायणगाव-जुन्नर रोडवरील जमीनीत अतिक्रमण करून डागडूजी प्रयत्न केल्याबाबत मंत्रालय, कायदा याहून मोठे प्रस्थ असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. सदर घटनेची सखोल चौकशी करावी. गावात तीन शासकीय रस्ते असताना गर्भवती महिला व शालेय मुले (गावातील गर्भवती महिलांची मोजणी व्हावी) आदी थातूरमातूर कारणे पुढे केली जातात. तीन शासकीय रस्ते असताना उत्तम विष्णू खांडगे व चंद्रकांत विष्णू खांडगे या दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीतील २६ गुंठे जमिनीची भूसंपासन नसतानाही पोलीसी पाठबळावर झालेली नासाडी या सर्व प्रकरणाची मंत्रालयीन पातळीवर चौकशी व्हावी. (गावातील काही ग्रामस्थ मंत्रालयीन ओळखीच्या बळावर हे प्रकरण दडपण्याचीही भीती आहे) आपण घटनेचे गांभीर्य पाहता व दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतात झालेले बेकायदेशीर अतिक्रमण व पोलीसी बळावर केलेली डागडूजी व कागदपत्रांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यासह त्याच्या परिवाराला अटक करण्याची वारंवार धमकी देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून आम्हा पिडीत शेतकरी परिवाराला न्याय द्यावा. आज आमचीच जमिन जावून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिसी बळ यामुळे आमच्या घराच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. आमच्यातील कोणीही मनोरूग्ण होण्याची अथवा तणावामुळे दगावण्याचीही भीती आहे. भूसंपादन नसताना, कागदावर आमचेच शेत हे सातबाऱ्यावर असताना आज जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कार्यालय आमच्या शेतातील २६ गुंठेवर अतिक्रमण करत आहे. उद्या या प्रकरणामुळे कोणी शेतातून जाण्यास पायवाट अथवा बैलगाडी जाण्यास परवानगी देणार नाही. आमच्यावर अन्याय झाला आहे. होत आहे. जमिन गेली आहे. जिवाला धोका आहे. आपण न्याय द्यावा व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे अधिकारी वर्ग सातत्याने केसचा निकाल आमच्या बाजूने लागलाय., असे सांगून दिशाभूल करत आहे. निकाल लागलेला नसताना जुलै महिन्याची तारीख असताना प्रलंबित खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे, हे सांगण्याचे धाडस ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन, जिल्हा परिषद अधिकारी कसे सांगू शकतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे आमच्या होत असलेल्या मुस्कटदाबीच्याविरोधात, आमच्या २६ गुंठे जागेवर भूसंपादन न करता झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात पोलिसी बळाच्या जोरावर ग्रामपंचायत सदस्यांनी पुन्हा एकवार अतिक्रमणाची डागडूजी केली आहे. आमच्या शेतात, ते अतिक्रमण पूर्णपणे आमच्या शेतात झालेले आहे. दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांची २६ गुंठे जागा अतिक्रमण करण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पोलिस हे सर्व एकत्र येतात. एकाद्या चित्रपटाला साजेसे कथानक घडले आहे. आपण याप्रकरणाची चौकशी करावी. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना, प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना केस आम्ही जिंकलो आहोत, निकाल आमच्या बाजूने लागला आहे, असे सांगत महिला सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी फोटोसेशन केले आहे. आमच्या शेतातील अतिक्रमणावर उभे राहून प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहे. या सर्व घडामोडीची आपल्या दरबारी नोंद असावी. कारण मंत्रालयात काम करणारे आमच्या गावातील काही घटक मंत्रालयीन ओळखीचा वापर करत या अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याची माहिती खुद्द ग्रामस्थच ऑफ द रेकॉर्ड खासगीत बोलताना माहिती देत आहेत. पोलिसी बळावर भूसंपादन नसणाऱ्या जमिनीवर डागडूजी करणाऱ्या व आम्ही कागदाची मागणी केल्यावर ७७ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्यासह त्याच्या परिवाराला अटक करण्याचे पोलिसांना निर्देश देत पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. आम्हाला न्याय द्या. दोन्ही वयोवृद्ध शेतकरी व त्यांचा परिवार कमालीचा तणावाखाली आहे. दोन्ही वयोवृद्ध शेतकरी सख्खे भाऊ आहेत. त्यांना व त्यांच्या पत्नीला दोन्ही परिवाराला विविध आजार आहेत. यामध्ये शेतामध्ये झालेले ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पोलिसी बळ आणि मंत्रालयात काम करणारे घटक ओळखीच्या बळावर पडद्यामागून सूत्रे हलवत दबाव वाढवत असल्याने वयोवृद्ध शेतकऱ्याच्या परिवारातले कोणीही मानसिक धक्क्याने दगावण्याची भीती आहे. आपण याप्रकरणी विस्तृत चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.