सौ. सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेतील रहीवाशांसाठी साथीच्या आजाराविषयी आरोग्य विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाचे दिवस आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी आहे. दरवर्षी नवी मुंबईकरांना पावसाच्या दिवसामध्ये ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस व अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. पावसाचा जोर बाढल्यावर महापालिकेच्या व खासगी रूग्णालयात रूग्णांची गर्दी दिसते. आजार झाल्यावर उपचार करण्याएवजी आजार न होण्यासाठी काळजी घेणे उत्तम आहे. त्यामुळे पावसाच्या कालावधीत साथीचे आजार होवू नये यासाठी काय उपाययोजना करावी, काय पथ्ये पाळावीत यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मनपाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८,१८ए, २४, २८, सेक्टर २० या नेरूळ नोडमध्ये मार्गदर्शनपर स्वरूपात जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.