स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहरात नव्याने होत असलेले अंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरात मोठे प्रकल्प उभे राहत असल्याने या शहरात इतर शहरामधून नागरिक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात या दृष्टीकोनातून भविष्यात शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नवी मुंबईकरांना होऊ नये यासाठी एमएमआरडीए मार्फत सुरु असेलेल्या ऐरोली कटाई नाका या प्रकल्पाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली.
त्यावेळी एमएमआरडीए अधीक्षक अभियंता साखळकर, कार्यकारी अभियंता राठोड, एमएसइबी चे अधीक्षक अभियंता गायकवाड, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. अभियंता संजय वाडवे, नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता सोनावणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बेंडे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, डी आर पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहर प्रमुख विजयानंद माने, मंगेश साळवी, महेश कोठीवाले, प्रकाश चिकणे, महिला संघटक रंजना शिंत्रे, माजी नगरसेवक चेतन नाईक, रवी म्हात्रे, चंद्रकांत शेवाळे, अवधूत मोरे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात पहिल्या टप्प्यातील ठाणे बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ या मार्गातील टनेल च्या कामाची पाहणी केली. त्याचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. व दुसऱ्या टप्प्यातील ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर मार्ग या २.५७ किमी एलिव्हेटेड मार्गातील अडथळा ठरणारी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी ची ४०० केबी विद्युत प्रवाह वाहिनी स्थलांतर करण्याचे काम दोन महिन्यात करून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीचे सी एम डी संजय कुमार यांनी दिले आहे. या विद्युत प्रवाह वाहिनीच्या स्थलांतरासाठी १५ ते १६ दिवस काम करण्यास लागणार आहेत. या विद्युत वाहिनीतून संपूर्ण मुंबई रिजन मध्ये पुरवठा होत असल्याने तांत्रिकदृष्ट्या पुरवठा बंद न करता काम कसे करता येईल याचा अभ्यास करून याचे काम दोन महिन्यात पूर्ण करून देऊ असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी खासदार राजन विचारे व कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा सन २०१५ पासून पाठपुरावा सुरु होता. या कामाच्या भूमिपूजनानंतर ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून या महत्वकांक्षी प्रकल्पातील जमीन अधिग्रह प्रक्रिया असो, वन खात्याच्या परवानग्या असो या मिळवून या प्रकल्पातील अडथळे दूर केले आहेत. या होणाऱ्या नवीन मार्गामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातील प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे. ऐरोली ते कटाई नाका हा प्रवास १० मिनिटाचा असणार आहे. त्याचबरोबर हा मार्ग ठाणे बेलापूर मार्गाला जोडण्यासाठी १०० कोटी निधी मंजूर झाला असून रॅम्प उभे करण्याचे काम लवकर सुरु होणार आहे. असे खासदार राजन विचारे यांनी म्हंटले आहे.
प्रकल्पाची माहिती
Ø या प्रकल्पाचे भूमिपूजन २१ मे २०१८ रोजी करण्यात आले.
Ø पहिला टप्पा – ठाणे – बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा 3.43 किलोमीटर लांबी चा मार्ग असून १.६९ किमी लांबीचे दोन टनेल त्यामध्ये ३+१ व ३+१ लेनच्या मार्गीका आहेत यावर २३७.५५ कोटी मंजूर आहेत.
Ø या दोन्ही टनेलचे ७८ टक्के काम पूर्ण झालेले आहे.
Ø दुसरा टप्पा – ऐरोली पूल ते ठाणे -बेलापूर मार्ग हा 2.५७ किलोमीटरचा एलिव्हेटेड ३+३ लेनच्या मार्गीका आहेत व ट्रान्स हार्बर रेल्वे लाइन वरून हा मार्ग जोडणारा आहे यावर 275.९० खर्च केले आहे.
Ø या दुसऱ्या टप्प्यातील एलिव्हेटेड पुलासाठी लागणारे पिलर चे काम ६९ टक्के काम पूर्ण झालेले आहे.