सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जुईनगर व सानपाडा नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर शेवाळ साचण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस अजून पाच-सहा सतत राहील्यास हे शेवाळ वाढून पदपथ निसरेड होण्याची शक्यता आहे. पदपथ निसरडे झाल्यास त्यावरून ये-जा करणारे महिला-पुरूष, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक चालताना घसरून पडण्याची व त्यांना दुखापत होण्याची भीती आहे. समस्या निर्माण होण्यापूर्वी व त्या समस्येमुळे इतरांना त्रास होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने सानपाडा व जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथावर शेवाळ साचणार नाही, याची काळजी घ्यावी की जेणेकरून लोकांना पदपथावरून ये-जा करताना त्रास होणार नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता आपण जुईनगर व सानपाडा नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याचे आपण संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.